ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या पिंपरी आणि आळंदी परिसरात धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला आहे. 1 जानेवारीला एका घरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी तिघांविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती घरात असताना तीन व्यक्ती त्यांच्या घरात शिरल्या. त्यांनी तुमचे सगळे आजार ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेने आम्ही बरे करतो. घरातील सर्व देव टाकून द्या. तुमच्या आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी येशू ख्रिस्तांची पूजा करा. मातंग धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी त्यांनी तक्रारदारांना आग्रह केला. तसेच तक्रारदाराच्या पुढे छोटे-छोटे ग्लास ठेवण्यात आले आणि हे येशूंचे रक्त आहे, ते प्या असे सांगण्यात आले. मात्र, ते रक्त नसून द्राक्षाचे पाणी होते.
अधिक वाचा : राज्यात १२२ नवीन क्रीडा संकुले उभारणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
घरात शिरलेल्या या व्यक्तींनी अशा प्रकारे आपले धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.