ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
जाधव यांनी मुंब्रा डोंगरावर असलेला अनधिकृत दर्गा आणि मशिदीच्या विरोधात आवाज उठवला होता. याप्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘हम उसे जिंदा नही छोडेंगे, ये बच नही पाएंगे’, असा उल्लेख या व्हायरल ऑडिओत असून, या ऑडिओ क्लिपसोबत एक मेसेजही व्हायरल होत आहे. त्यामध्ये ‘बॉयकॉट अविनाश जाधव’ असा उल्लेख आहे.
दरम्यान, या प्रकरणी नौपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील मनसैनिकही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अधिक वाचा : ‘शिवसृष्टी’साठी राज्य सरकारकडून 50 कोटींचा निधी प्राप्त