Tarun Bharat
sharad pawar, deepak kesarker

केसरकरांनी शरद पवारांची जाहिर माफी मागितली; म्हणाले, ते माझे गुरु…

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

माझ्या राजकीय जीवनाच्या जडणघडणीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा मोठा हात आहे. तुम्ही माझी कोणतीही क्लिप पाहू शकता यात मी त्यांच्याबद्दल एकही अपशब्द वापरला नाही. त्यांच्या बद्दल आजही आम्हाला आदर आहे. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून लोकांची डोकी भडकवली जात आहेत. ते माझ्या गुरुसमान आहेत. तराही मी जर चुकीचं बोललो असले तर जाहीर माफी मागतो. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलगिरी व्यक्त केली. शरद पवार यांनी स्वप्न पाहू नये असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. आज त्यांनी याबाबात स्पष्टीकरण दिलं.

यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेत जी फूट पडली याविषयी मी बोललो आहे. आणि हिच वस्तुस्थिती आहे. 2014 मध्ये सरकार स्थापनेनंतर पोवार साहेबांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्याकाळातही सेनेची ताकद कमी झाली होती. यासंर्दभात आता काहीही बोलण्यात अर्थ नाही. माझ्याकडून जर त्यांना अपशब्द गेले असतील तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले.

हेही वाचा- सेनेला पुन्हा धक्का; नवी मुंबईतील आणखी 5 नगरसेवक शिंदे गटात

जितेंद्र आव्हाड माझ्याकडे नारायण राणेंच्या मुलांचा निवडणूकीत प्रचार करा हे सांगण्यासाठी आले होते. पवार साहेब जेव्हा सावंतवाडी मतदार संघात आले तेव्हा मी त्यांच्याकडे अत्यंत नम्र शब्दात राजीनामा दिला असेही त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले, उध्दव ठाकरेंनी आम्हाला आशिर्वाद द्यावेत. राजकारण कुठल्याही व्यक्तीसाठी किमवा पक्षासाठी नसतं. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला. नारायण राणेंशी कुठलाही व्यक्तीगत वाद नाही.

हेही वाचा- खाद्यान्नावरील GST विरोधात शनिवारी देशव्यापी बंद

राणेंविषयी बोलताना ते म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्याविषयी आपुलकी असले तर मातोश्रीवर भांडी घासायला जा असे ट्विट केले गेले.त्यांनी उध्दव साहेबांचा अपमान केला आहे. मात्र सिंधुदुर्गच्या कोणत्याच शिवसैनिकाला आवाज उठवावा असं वाटलं नाही. नारायण राणेंशी कुठलाही व्यक्तीगत वाद नाही. राणेंची मुलं कशी बोलतात याची काळजी घ्यायला नारायण राणे समर्थ आहेत. भविष्यात मला जर राणेंशी काम करायची संधी मिळाली तर मी राणेंशी बोलेण त्यांच्या मुलांशी नाही बोलणार असेही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

कोल्हापूर : आर. के. नगरमधील वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

नोकरीच्या अमिषाने 90 हजारांची फसवणूक

Patil_p

कामगार हक्काचे संरक्षण व विविध मागण्यांसाठी सर्व कामगार संघटनांच्या वतीने देशव्यापी निदर्शने

Abhijeet Shinde

२४ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान राज्यात नाईट कर्फ्यू

Abhijeet Shinde

बागणीत मृत बिबट्याचे पिल्लू सापडल्याने खळबळ

Abhijeet Shinde

नोकरीसाठी गंडा घालणारी टोळी जेरबंद

Patil_p
error: Content is protected !!