मौजेदापोली / वार्ताहर
दापोली (Dapoli) तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी शनिवारी एक निर्मनुष्य लाईफ बोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड (Murud) समुद्रकिनारी शनिवारी सकाळी ही लाईफ बोट आढळून आली. या लाईट बोटीमध्ये कोणीही व्यक्ती नाही. शिवाय ही लाईफ बोट फुटलेली आहे. नुकतीच देवगड येथे एक तेल वाहून नौका बुडाल्याने त्या बोटीचा या बोटीशी संबंध असावा काय याबाबत तपास सुरू आहे. मात्र या लाईफ बोटीतील व्यक्ती कुठे गायब झाल्या याबाबत तर्क लढवण्यात येत आहेत. या घटनेचा दापोली पोलीस तपास करत आहेत.
हे ही वाचा : व्याजवाडीच्या जवानाची साताऱ्यात आत्महत्या