प्रतिनिधी / सातारा :
Vyajwadi soldier commits suicide in Satara गणेशोत्सव काळात सुट्टीवर आलेल्या व्याजवाडी (ता. वाई) येथील जवानाने शुक्रवारी दुपारी 4.45 च्या सुमारास सातारा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय सुदाम कुदळे (वय 34, सध्या रा. अमरलक्ष्मी, प्रेरण सोसायटी, सातारा) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्याजवाडी येथील आयटीबीपीमध्ये सेवेत असलेले विजय कुदळे हे सुट्टीवर आले होते. ते सुट्टी संपवून पुन्हा जाण्याच्या तयारीत होते. तोच शुक्रवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यात रहात असलेल्या अमरलक्ष्मी येथील प्रेरणा सोसायटीमध्ये छताच्या हुकाला ओढणीने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. ते लटकत असल्याचे त्याचे साडू भानुदास वाघ यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच त्यांना उतरवून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी व्याजवाडी येथे नेण्यात आले. गावामध्ये शोककळा पसरली असून, दुपारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
अधिक वाचा : पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक प्रकार