ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Dr. Vishwas Mehndale passed away ज्येष्ठ अभिनेते व माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे आज सकाळी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मुलूंड पूर्व येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.
विश्वास मेहंदळे हे दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक होते. दूरदर्शनच्या मुंबई केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिलं. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ‘सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन’चे ते संस्थापक होते.
अधिक वाचा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आ. रोहित पवार
लेखक आणि अभिनेते अशीही त्यांची ओळख होती. एकच प्याला, एक तमाशा अच्छा खासा, अग्निदिव्य, खून पहावा करून, नांदा सौख्यभरे, जर असं घडलं तर, पंडित आता तरी शहाणे व्हा, प्रेमा तुझा रंग कसा यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये मेहेंदळे यांनी भूमिका साकारल्या. तसेच 18 हून अधिक पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं आहे.