Tarun Bharat

म्हाडाच्या परीक्षेत डमी उमेदवार; 60 मुन्नाभाईंवर गुन्हा

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Dummy candidates in MHADA exam म्हाडाच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, तब्बल 60 मुन्नाभाईंविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हाडाच्या तांत्रिक आणि अतांत्रिक अशा 14 संवर्गातील 565 पदांसाठी यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. एका आयटी कंपनीच्या माध्यमातून राज्यातील 106 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली होती. परीक्षेदरम्यान डमी उमेदवार बसवणे, इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेऊन जाणे असे प्रकार घडले होते. त्यामुळे 9 उमेदवारांविरोधात बीडमधील शिवाजीनगर, पवई, सातारा, बडनेरा, नागपूर, नाशिक आणि अमरावतीच्या नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परीक्षेतील कॉपीचा हा प्रकार समोर आल्यानंतर म्हाडाने चौकशी समिती तयार केली.

अधिक वाचा : …तर पुढचे पाऊल ‘महाराष्ट्र बंद’चे

त्यानंतर चौकशी समितीने परीक्षा देणाऱ्या 1663 उमेदवारांना कागदपत्रे घेऊन तपासणीसाठी बोलावले. लॉग डिटेल्स आणि सीसीटिव्ही तपासल्यानंतर 39 उमेदवार डमी बसल्याचे तर 21 उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर केल्याचे समोर आले. चौकशी समितीने यासंदर्भात 150 पानांचा अहवाल पोलिसांना दिला. त्या अहवालाच्या आधारे खेरवाडी पोलिसांनी 60 मुन्नाभाईंवर गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

आता देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट; नीतेश राणेंकडून उपमुख्यमंत्र्यांना पदवी बहाल

datta jadhav

”पंतप्रधान मोदींचे मौन हे द्वेषपूर्ण आवाजांना बळ देणारे”

Abhijeet Khandekar

अपघातग्रस्त दाम्पत्याची पालकमंत्र्यांनी केली चौकशी

Patil_p

गुटखा जोमात गाव कोमात

Archana Banage

गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीन चिट

Archana Banage

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 15 हजारच्या उंबरठ्यावर

Tousif Mujawar