भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somayya) राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांच्यावरिल ईडीच्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरात त्यांनी कोल्हापूर जिल्हा बॅंकेमध्ये (KDCC) 500 कोटींचा घोटाळा असल्याचा नव्याने आरोप केला. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनीही हसन मुश्रीफ यांच्यावर गंभिर आरोप केले. आपल्या आरोपांना खोडून काढत आमदार हसन मुश्रिफ यांनी आपल्याविषयी बदनामी पसरवली जात असून किरीट सोमय्या यांच्यामुळे बॅंकेचीही बदनामी होत असल्याचे म्हटले आहे.
पहा VIDEO >>>> हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद LIVE
जिल्हा बॅंकेत घतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, “आज किरीट सोमय्या यांनी येऊन बँक कामकाजबद्दल गौरवोदगार काढले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण मतदार संघात जे शिखंडी तयार झालेत जे पाठीमागून वार करत आहेत.” अशा शब्दात भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा >>>> मुश्रीफ यांची जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी- किरीट सोमय्या
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी वारंवार सांगत आलो आहे कि, मी आणि कुटुंबियांनी एका पैशाचेही कर्ज घेतलेले नाही. माध्यमात छापून आलेल्या बातमीचा विपर्यास करण्यात आला. मी असे कधीही म्हणालो नव्हतो कि मी कारखान्यासाठी कर्ज घेतले नाही. फक्त बेकायदेशीर कर्ज घेतले नाही असे म्हणालो होतो.” असा खुलासा आमदार मुश्रीफ यांनी केला.
तसेच “ईडीकडून चौकशी सुरु असताना पण किरीट सोमय्या का आले होते हे कळलेच नाही, ते केवळ बदनामी करण्यासाठी आले होते. त्यामागे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगेचा हात असल्याची आता खात्री झाली आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ही समरजित घाटगे यांची प्रवृत्ती आहे. शाहू दूध संघ विकल्यानंतर त्यांनी केंद्राकडून 15 कोटींचे अनुदान घेतले.” असा त्यांनी समरजीतसिंह घाटगेवर केला.
जिल्हा बँकेत कोणताही गैरव्यवहार नसल्याचे सांगताना ते म्हणाले, “मी जिल्हा बँकेत काहीच चुकीचे केले नाही, तोट्यात असलेली बँक नफयात आणली आहे. हसन मुश्रीफ या मोठ्या बँकेचा चेअरमन होतोय हे अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे. शेतकऱ्यांच्या ठेवीवर मुश्रीफ यांनी कर्ज काढल्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. एकही शेतकरी माझ्याकडे तक्रार घेऊन आला तर कोणतेही शिक्षा भोगण्यास तयार आहे. बदनामी करण्यासाठी कारस्थान केले जातेय. लॉंग टर्म कर्ज फेडीसाठी नाबार्डच्या आत्मनिर्भर धोरणाच्या माध्यमातून कालावधी वाढवला आहे. त्यामुळे बँकेत काहीच चुकीचं झाले नाही, पण घाटगे यांची मळमळ बाहेर आली.” असे स्पष्टीकरण आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले.