पुणे / प्रतिनिधी :
पुण्यातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) शुक्रवारी छापे टाकण्यात आले.
कल्याणीनगर भागात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. बांधकाम कंपनीच्या कार्यालयावर ईडीच्या पथकाने शुक्रवारी छापे टाकले. कार्यालयातून ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे ताब्यात घेतली. ईडीच्या पथकाकडून बांधकाम व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. हडपसर परिसरातील महंमदवाडी भागात बांधकाम व्यावसायिकाकडून बांधण्यात आलेल्या सोसायटीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.
ईडीच्या मुंबई पथकाने ही कारवाई केली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. सायंकाळपर्यंत बांधकाम व्यावसायिकाची चौकशी सुरू होती. बांधकाम व्यावसायिकाने पुण्यात येरवडा, कल्याणीनगर, एनआयबीएम रस्ता, वानवडी आदी भागांत मोठे गृहप्रकल्प साकारले आहेत.
अधिक वाचा : आरटीईसाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ
दरम्यान, १० मार्च रोजी ईडीकडून पुण्यातील रोझरी स्कूलचे संचालक विनय आरहाना यांना अटक करण्यात आली. काॅसमाॅस बँकेची २० काेटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरहाना यांना अटक करण्यात आली होती. मुंबईतील विशेष न्यायालयाने आरहाना यांना २० मार्चपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.