ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असतानाच चिंचवडमधील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी निवडणूक आयोगाने नोटीस धाडली आहे. पेड न्यूजप्रकरणी ही नोटस पाठविण्यात आली असून, जगताप यांच्याकडून लेखी उत्तर मागितले आहे.
अश्विनी जगताप यांच्यासंदर्भात एका साप्ताहिकात आणि न्यूज पोर्टलवर आलेला मजकूर पेड असल्याचे माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समितीच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र पाठवले. त्यावरून निवडणूक आयोगाने 16 फेब्रुवारीला जगताप यांनी नोटीस धाडली. जगताप यांनी या नोटेसवर 20 फेबुवारीला एमसीएमसी समितीकडे खुलासा पाठवला आहे. ही समिती या उत्तराची पडताळणी करुन पुढील कारवाई निश्चित करणार आहे.
अधिक वाचा : शिवसेना भवन वा कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही
दरम्यान, मागील काही दिवसात चिंचवड मतदार संघात आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी 10 तक्रारींची दखल घेत कारवाई करण्यात आली आहे.