Tarun Bharat

माजी आमदार चंद्रदीप नरकेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

Advertisements

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे हे कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके (Chandradip Narake) हे कोल्हापूर विमानतळावर हजर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे नरके शिंदे गटात जाणार अशा चर्चेला उधाण आलेला आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे शिवसेनेत बंडखोरी करत भाजप सोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. शिवसेनेतील जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन त्यांनी वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झालेत. त्यात जिल्ह्यातील दोन खासदार आणि आमदार शिंदे गटात दाखल झालेत. तर आजी-माजी आमदार पदाधिकारी देखील शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. आज मुख्यमंत्री कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी करवीरचे माजी आमदार विमानतळावर दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

हे ही वाचा : शिवसेना आमचीच; मंत्री दीपक केसरकारांचा दावा

दरम्यान, करवीर चे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिणचेकर देखील शिंदे गटात दाखल होण्याची चर्चा आहे. आज मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूरला येत असताना माजी आमदार नरके यांनी विमानतळावर हजेरी लावत त्यांचे स्वागत करत भेट घेतली. त्यामुळे दोन्ही माजी आमदार शिंदे गटात जाणार अशी चर्चा आहे. मात्र निवेदन देण्यासाठी आलोय असे नरके यांनी स्पष्ट केले.

नरकेंकडून स्पष्टीकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर येत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वागतासाठी चंद्रदीप नरके विमानतळावर गेल्याने ते शिंदे गटात दाखल होणार अशा चर्चा असताना नरके यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. खेळाडूंच्या सत्कारासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो असल्याचं त्यांनी सांगितलं.

Related Stories

खंडपीठ कृती समितीची जानेवारीत मुख्य न्यायमूर्तींशी भेट

Sumit Tambekar

महिलांसाठी विशेष बस सेवा

Abhijeet Shinde

पुणे पदवीधरसाठी रयत क्रांतीतून डॉ. चौगुले यांना उमेदवारी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हातात शस्त्र घेतलेला ‘त्या’ नशाबाजांचा फोटो व्हायरल

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून नवमतदार नोंदणी

Abhijeet Shinde

पुईखडी येथे एसटी बसची डंपरला पाठीमागून धडक, चालकासह तिघे जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!