Tarun Bharat

राज्यातील सत्तासंघर्षावर आजच सुनावणी

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

राज्यातील सत्तासंघर्षावर मागील महिनाभरापासून लांबणीवर पडत असलेली सुनावणी आज दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. ही सुनावणी पटलावर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पुढे ढकलली गेली होती. त्यामुळे शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आज याचिका मेन्शन केली. सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. न्यायालयाने शिवसेनेची ही विनंती मान्य केली. आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एन व्ही रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.

यापूर्वी 8 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट अशी सुनावणी पुढं ढकलण्यात आली होती. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात तातडीनं मेन्शन केलं.

हेही वाचा : मुंबईतील पंचतारांकित ललित हॉटेल बॉम्बने उडविण्याची धमकी

Related Stories

प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंत्री लोढांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

Archana Banage

सांगली शहरातील विजय नगरमध्ये सापडला कोरोनाचा रुग्ण

Archana Banage

भारत जोडो ऐवजी काँग्रेस जोडो यात्रा करा, शायना एनसी

Archana Banage

कोरोना पार्श्वभूमीवर कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान

Archana Banage

सांगली : अँटिजेनमध्ये मनपाचे तीन कर्मचारी पॉझिटिव्ह, ५८ नवे रुग्ण

Archana Banage

जिल्ह्यात आतापर्यंत 720 कोटींचा जीएसटी महसूल जमा

Abhijeet Khandekar