पुणे / प्रतिनिधी :
पश्चिमी झंजावातामुळे 1 जानेवारी(2023)पासून पुढील 5 दिवस (1ते 5 जानेवारी) दरम्यान उत्तर भारतात बर्फ, पाऊस, तर महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ प्रा.माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
उत्तर भारतात झालेल्या पहिल्या पश्चिमी झंजावाताने 23-27 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्राला काहींशी थंडी दिली. त्यामुळे उ. भारतात दाट धुक्याची चादर आहे, तर त्या वातावरणाने सध्या महाराष्ट्रातील थंडीही कमी केली आहे. मात्र आणखी एक पश्चिमी झंजावत या भागात आल्याने राज्यात पुन्हा थंडी परतणार आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही.
अधिक वाचा : किम जोंग यांचा नववर्षाचा नवा संकल्प