Tarun Bharat

जम्मूमधील किश्तवाडमध्ये ३०० फूट खोल दरीत कोसळली कार, ८ जण ठार

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जम्मू-काश्मीरच्या (jammu and kashmir) किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (jammu eight people died in a tragic accident in kishtwar tata suv car fell into a deep gorge)

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात मंगळवारी एक कार रस्त्यावरून जात असताना ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात १६ वर्षीय मुलीसह आठ जणांचा मृत्यू झाला तर तीन लोक गंभीर जखमी झाले आहेत. किश्तवाड जिल्ह्यातील बुंदा छत्रु चांगा परिसरात टाटा सुमो या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे टाटा सुमो थेट खोल दरीत कोसळली. त्यामुळे या गाडीतील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, काही वेळाने ३ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस, राष्ट्रीय रायफल्स व स्थानिक लोकांनी तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू केले.

हे ही वाचा : ट्रक-दुचाकी अपघातात जुनेखेडचा एक ठार

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच लोकांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर तीन अन्य लोकांनी रुग्णालयात जाताना जीव सोडला. या अपघातातील तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. माजी मंत्री जीएम सरूरी यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाईची मागणी केला आहे.

Related Stories

गोकुळ निवडणूक : सत्ताधारी आघाडीच्या शौमिका महाडिक, तर विरोधी आघाडीच्या अंजना रेडकर विजयी

Archana Banage

3 वर्षांच्या मुलीचे होतेय कौतुक

Patil_p

खनिज कायदा दुरुस्ती अध्यादेशाला मंजुरी

Patil_p

स्मार्ट पोलिसिंग बळकट करणार!

Patil_p

दैनंदिन संक्रमितांचा आकडा 50 हजारांखाली

datta jadhav

अमेरिकेत अँटीबॉडीद्वारे औषधाची निर्मिती

Patil_p