शहरासह धरणक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. परिणामी महापालिकेचे नदी लगत असणाऱ्या उपसा केंद्राजवळ 542 मीटरवर पाणी आहे. आणखीन अडीच मीटर पाणी वाढल्यास शहरावर पाणी संकट येण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान खात्याने आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. पुन्हा महापुरात 10 ते 12 दिवस पाणीपुरवठा बंद होण्याची टांगती तलवार असून शहरवासियांच्या दृष्टीने दोन दिवस फार महत्वाचे आहेत.
कोल्हापूर महापालिकेचे नदी लगत शिंगणापूर,नागदेववाडी आणि बालिंगा येथे उपसा केंद्र आहेत. 2019 आणि 2021 च्या महापुरात तीन उपसा केंद्र पाण्यात गेल्याने शहरातील 12 ते 14 दिवस पाणी बंद होते. टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली. सध्या पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीची पातळी झपाटयाने वाढत आहे. बुधवारी 37 फुटांवर पातळी होती. यामुळे उपसा केंद्राच्या परिसरात पुराचे पाणी आले आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उपसा केंद्र पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला असून शहरावर पाणी संकटाची टांगती तलवार आहे.
उपसा केंद्राजवळील सध्याची पाणी पातळी- 542 मीटर
उपसा केंद्र पाण्यात जाणार-544.50 मीटर
हेही वाचा- Kolhapur: सीईओ चव्हाण यांची संभाव्य पुरबाधीत गावांना भेट
ई वॉर्ड धोक्यात
दोन वेळा उपसा केंद्र पाण्यात गेल्याने शहरावर पाणीबाणीला सामोरे जावे लागले. अशी स्थिती पुन्हा होवू नये म्हणून महापालिकेने बालिंगा उपसा केद्रांमध्ये 300 एच.पीचे दोन सबमर्सिबल पंप बसविल्या आहेत. त्यामुळे बालिंगा उपसा केंद्रात जरी पाणी आले तरी हे दोन पंप सुरू राहणार आहेत. त्यामुळे निम्म्या शहरात दिवसाआडने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. यामध्ये ए, बी वॉर्डला एक दिवस तर दुसऱ्या दिवशी सी आणि डी वॉर्डला पाणीपुरवठा केला जाईल. ई वॉर्डला मात्र,पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. येथे टँकरनेचे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
Previous Articleसचिन हॉस्पिटलमध्ये रविवारी मोफत शिबिर
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.