Tarun Bharat

कोल्हापुरात ‘चायना मेड’ला ‘नो एंट्री’

‘मेक इन लोकल’ ची मागणी वाढली : चीनी वस्तूंची उलाढाल थंडावली : 400 कोटींची बाजारपेठा काबीज :

विद्याधर पिंपळे/कोल्हापूर

मागील दोन-तीन वर्षापासून चीनी उत्पादनावर बहिष्कार घालण्यात आला आहे. चिनी मालापेक्षाही दर्जेदार परंतू स्वस्तात देशी बनावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. देशी उत्पादनं वापरण्याबाबत प्रबोधन होऊन मागणीही वाढली. परिणामी यंदाच्या दिवाळीत किमान 100 कोटी रुपयांच्या चिनी उत्पादनांची मागणी घटेल. देशी उत्पादनासह स्थानिक बाजारातील वस्तूंची डिमांड वाढणार आहे. चिनी वस्तू बायकॉटमुळे आर्थिक वर्षात सरासरी 400 कोटी रुपयांची बाजारपेठ स्थानिकांना मिळत असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.

स्वस्तात मस्त अशी सर्वात जास्त मागणी असलेल्या चीनी वस्तूवर देश पातळीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. चिनी मालाची आवकही मंदावली. आता चिनी मालाचा मागील स्टॉकही पूर्णतः संपला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये लोकांकडून मेक इन लोकलला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. चिनी वस्तू टिकावू नाही तरी टाकावू असल्या तरी तुलनेत खूपच स्वस्त असल्याने वेळ मारुन नेण्यासाठी खरेदी करण्याकडे ग्राहकाचा कल असतो. दरवर्षी नवी वस्तू घ्यायची या हिशोबाने स्वतातील चिनी मालाकडे विशेषतः सण उत्सवात ग्राहक आकर्षित होत असतो. चिनी मालाची आवक कमी-कमी होत जाईल तशी स्थानिक उत्पादीत वस्तूंची त्याची जागा घेण्यास सुरूवात केली. तुलनेत चिनी वस्तूंच्या किंमतीला मात्र टिकावू वस्तू मिळू लागल्याने ग्राहकही चिनी वस्तूपासून अल्पकाळात दूर गेला.

हे ही वाचा : ध्वनी प्रदूषण कमी झाले, वायू प्रदूषणाचे काय

मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशभरात आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला आहे. पण यामध्ये स्वस्तात मस्त अशी ख्याती असलेल्या चिनी वस्तूंनी संपूर्ण बाजारपेठ व्यापली होती. देशभरात विविध सणउत्सव धुमधडाक्यात साजरे होतात. या उत्सवात रोषणाईपासून फटाक्य़ापर्यंतच्या चीनी वस्तूंची बाजारपेठ काबीज केली होती. चिनी वस्तूंचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी तसेच स्थानिक वस्तू उत्पादनासह ग्राहक मिळावा यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टैडर्स (कैट) या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेने गेल्या दोन वर्षापासून चीनी वस्तूवर बहिष्कार टाकला आहे. याबाबत मोठया प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. दोन वर्षात याचा परिणाम दिसून आला असून, चीनी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध आणले आहे.

कैटच्या रिसर्च ऍन्ड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीच्या विभागाने, देशातील मोठया अशा बाजारपेठ असलेल्या 20 शहरांचे सर्वेक्षण केले. यंदाच्या दिवाळीमध्ये चीनी फटाके, लाईट माळा, आकाश कंदील वा इतर वस्तूंची चीनला कोणतीच ऑर्डर दिलेली नाही. यामुळे यंदाच्या दिवाळीत देशभरात एक लाख कोटी तर कोल्हापूर जिल्हय़ामधील 100 कोटी रूपयाची चिनी वस्तूंची उलाढाल ठप्प होणार आहे. त्याऐवजी मेड इन इंडिया व मेड इन लोकलला प्राधान्य दिले आहे. कोल्हापूरात अनेकांनी स्टार्टअपच्या माध्यमातून लाईट माळा, पणती, आकाश कंदील बनवून बाजारात आणले आहेत. चिनी वस्तूंची जागा या स्थानिक उत्पादनांनी घेतली आहे. यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळून, अर्थव्यवस्थेला चालना मिळू लागली आहे.

कोल्हापुरातील 400 कोटीची चीनी वस्तूची विक्री थंडावली
वर्षंभरात अनेक सण, उत्सव होत असल्याने, चीनी फटाक्यापासून, आकाश कंदील, लाईट माळापर्यंत आदींची वस्तूंची विक्री सुमारे 400 कोटी रूपयांची होत असे. चीनी वस्तूवरील बहिष्कार व जनजागृतीमुळे कोल्हापुरातील 400 कोटीची तर दिवाळी काळात 100 कोटी रुपयाची विक्री थंडावून स्थानिक वस्तूंची विक्री होईल, असा अंदाज आहे. – धैर्यशिल पाटील, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टैडर्स

Related Stories

सरकारी व्हेंटिलेटरची खासगी हॉस्पिटलना खिरापत

Archana Banage

आरक्षण सोडतीनंतर कही खुशी, कही गम’

Abhijeet Khandekar

पुलाची शिरोली कोविड सेंटरला जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी मदत करेल

Archana Banage

कोल्हापूर : कुंभोज येथे बेकायदेशीर किटकनाशकाचा साठा जप्त

Archana Banage

मराठा आरक्षणावर घटनापीठ देणार फैसला

Archana Banage

इचलकरंजी योजना रद्द होईपर्यंत नेटाने लढा देण्याचा शेतकर्‍यांचा निर्धार

Archana Banage