पुणे / प्रतिनिधी :
प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari) स्पर्धेचे यजमानपद नगरला देण्यास प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याकरिता सकारात्मक भूमिका घेतली असून, नगरमध्येच कुस्तीचा थरार रंगण्याची चिन्हे आहेत.
पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात रविवारी कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीमध्ये वेल्हा, ठाणे आणि नगर यांनी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आयोजनाबाबत उत्सुकता दाखवली.
अधिक वाचा : महाराष्ट्र गारठला, अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअसने घटले
या स्पर्धेबाबत बोलताना परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. परिषदेच्या समितीने नगरच्या जागेची पाहणी केली आहे. असे असले, तरी पुढील आठवडय़ात मी स्वतः जाऊन स्पर्धेबाबतची माहिती घेणार आहे. त्यानंतरच स्पर्धा कुठे घ्यायची आणि त्याची तारीख काय असेल, याचा निर्णय घेतला जाईल.