Tarun Bharat

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी चूक; मुंबई दौऱ्यात अमित शाहांभोवती संशयास्पद व्यक्तीचा वावर

ऑनलाईन टीम/तरुण भारत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान (Amit Shah Mumbai Tour) त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना एक अज्ञात व्यक्ती सुरक्षा भेदत त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. एका खासदाराचा स्वीय सचिव असल्याचे सांगत एका व्यक्ती काही तास अमित शाह यांच्याभोवती वावरत होता. या व्यक्तिला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. हेमंत पवार असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शाह आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती वावरत होती. आंध्र प्रदेशातील खासदाराचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा : मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबर सजवली

हेमंत पवार असं या ३२ वर्षीय व्यावसायिकाचं नाव असून, त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत पवार मूळचा धुळ्याचा असून एका खासदाराचा पीए असल्याचा दावा करत आहे. त्याला मंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा होती. प्रसिद्धी किंवा फायद्यासाठी हे फोटो तो वापरणार होता असा संशय आहे.

Related Stories

बेंगळूर: ३८ परदेशी नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य; तपासणी दरम्यान सापडले ड्रग्ज आणि गांजा

Archana Banage

शिव्या देणे, ही कोल्हापूरची वा महाराष्ट्राची संस्कृती नाही

datta jadhav

महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर

Archana Banage

बुंदेली महिलांची व्यवसायात भरारी

Patil_p

आता जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन बनविता येणार

Patil_p

जे घडलं त्यामुळे समाधान मिळालं काय ?- अजित पवार

Abhijeet Khandekar