Tarun Bharat

वारकऱ्यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री

अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांवर स्वखर्चाने करणार उपचार

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

दोन दिवसांपूर्वी मिरज-पंढरपूर मार्गावर नागजजवळ पायी चालत जाणाऱ्या दिंडीत एक चारचाकी वाहन घुसल्याने अपघात झाला होता. या अपघातात १४ हून अधिक वारकरी जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांवर मिरज मधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या सर्व वारकऱ्यांच्या तब्येतीची आणि त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( CM Eknath Shinde) यांनी माहिती घेतली आहे. तसेच ज्या वारकऱ्यांना गंभीर दुखापत झालीय त्या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी मुख्यमंत्री शिंदे यांनी दर्शवली आहे.

मिरज-पंढरपूर मार्गावर नागजजवळ पायी चालत जाणाऱ्या दिंडीत चारचाकी वाहन घुसल्याने अपघात झाला. या अपघातात १४ हून अधिक वारकरी जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी सर्व वारकऱ्यांवर योग्य ते उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे त्यांनी निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

हे ही वाचा : …म्हणून भावना गवळींना प्रतोद पदावरून हटवले, संजय राऊतांनी केला खुलासा

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारीही दर्शवली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः मिरजमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे  जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

Related Stories

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली

Rohan_P

कोल्हापूर : जयसिंगपूर नगरपरिषद व आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सर्वेक्षण सुरू

Abhijeet Shinde

सातारा : जिल्हय़ात उच्चांकी २२८ बाधित

Abhijeet Shinde

नांदेड-भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना अपघात, एकजण ठार, एकजण गंभीर जखमी

Archana Banage

Sangli; एक कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलिस जॉन तिवडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Abhijeet Khandekar

प्रभु राम त्यांना कधीच आशीर्वाद देणार नाहीत : संजय राउत

Rahul Gadkar
error: Content is protected !!