Tarun Bharat

आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना

दापोली/प्रतिनिधी

दापोलीचे विद्यमान आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) हे शिवसेना (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी गुहाटीला रवाना झाले आहेत. यामुळे दापोली (Dapoli) विधानसभा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आमदार योगेश कदम हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. काल ते दिवसभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी होते. मात्र रात्री ते अचानक एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरिता गुवाहटीला रवाना झाले असल्याचे वृत्त आहे. सुरत मधून बंडखोर आमदारांना पहाटे एअरलिफ्ट करून गुवाहाटी येथे सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे. आ. योगेश कदम देखील गुवाहाटीला रवाना झाल्याने अनेक तर्कवितर्कांना ऊत आला आहे.

हेही वाचा : शिंदेंच्या गटाला यड्रावकर मिळाले

Related Stories

कर्नाटकमध्ये भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत गोळीबार केल्याप्रकरणी चौघांना अटक

Archana Banage

पुण्यातही एसटीचा ब्रेक फेल; भर चौकात सात गाड्या चिरडल्या

Archana Banage

“कर्नाटकची कोरोना तांत्रिक सल्लागार समिती नावापुरतीच”

Archana Banage

दिल्ली न्यायालयाने चित्रा रामकृष्णचा जामीन अर्ज फेटाळला

Abhijeet Khandekar

खर्च कमी करण्यासाठी पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

प्रक्षोभक भाषण प्रकरणी अकबरुद्दीन ओवैसी, बांदी यांच्यावर गुन्हा

datta jadhav