Tarun Bharat

सराईत गुंड अजय विटकर टोळीविरूद्ध मोक्का

पुणे / प्रतिनिधी :

Mokka against the Ajay Witkar gang in Pune संघटित गुन्हेगारी करत चतुःश्रृंगी ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार अजय चंद्रकांत विटकर (वय 20 रा. वडारवाडी ,पुणे) याच्यासह टोळीतील सात जणांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेली ही 98 वी मोक्का कारवाई आहे. त्यामुळे गुन्हेगारी टोळय़ांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजय चंद्रकांत विटकर (वय 20), विजय चंद्रकांत विटकर (18) दत्ता रविंद्र धोत्रे (22), सागर मनोहर धोत्रे (27), सिध्दार्थ शंकर गायकवाड (23) कृष्णा ऊर्फ किच्ची राजेश माने (25), अतुल धोत्रे (22) विजय ऊर्फ चपाती विटकर (23 सर्व रा. वडारवाडी, पुणे) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

अधिक वाचा : ‘शाओमी’चा 5551 कोटींचा निधी ईडी गोठवणार

विटकर टोळीने हिंसाचार करुन मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे जीवे ठार मारण्याची धमकी देणे, वाहनांची तोडफोड करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमावून हत्यारासह सामील होऊन दंगा करुन दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याच्या टोळीच्या अशा कृत्यामुळे या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याने वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. या टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी उपायुक्त रोहिदास पवार यांच्या वतीने अपर आयुक्त नामदेव चव्हाण व पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पाठविला. प्रस्तावाची पडताळणी करून टोळीविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे करीत आहेत.

Related Stories

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : सौरभ राव

Tousif Mujawar

स्मार्टसिटी अधिकाऱ्याच्या घरात 23 लाख रुपये सापडले

Tousif Mujawar

राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Archana Banage

घडाळ्याचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवावे लागतील पण लोकशाही वाचवावी लागेल; पृथ्वीराज चव्हाण

Abhijeet Khandekar

राहुल गांधींची वाजपेयींच्या समाधीला भेट; भाजपने केला ‘हा’ आरोप

Abhijeet Khandekar

पुणे विभागातील 32,634 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar