Tarun Bharat

शोरुममधील वाहनांची परस्पर विक्री, १६ लाखांची फसवणूक

बनावट कागदपत्रांचा वापर करून तरूणाचा कारनामा

प्रतिनिधी/कोल्हापूर

शोरुममधून 15 दुचाकींची परस्पर विक्री करुन 16 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्टॉक किपरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वैभवन दिनकर पवार (वय. 29 रा. शिवाजी पेठ) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सुरेश शिवराम काशीद (वय 52 रा. आर. के. नगर) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.

याबाबतची माहिती अशी, शिवाजी उद्यमनगर परिसरात एका नामांकीत कंपनीचे दुचाकी विक्री शोरुम आहे. सुरेश काशीद हे या कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत. तर संशयीत आरोपी वैभव पवार हा याच कंपनीमध्ये स्टॉक किपर म्हणून नोकरीस होता. सन 2019 ते 19 ऑगस्ट 2022 या दरम्यान पवारने स्टॉकमधील 15 दुचाकींची परस्पर विक्री केली. मात्र या व्यवहारातील रक्कम त्याने कंपनीमध्ये जमा न करता परस्पर स्वतःच्या फायद्याकरीता वापरली. व्यवहार करताना कंपनीची बनावट बिले तयार केली तसेच विमा कंपनीच्याही बनावट पावत्या तयार करुन कंपनी व ग्राहकांची फसवणूक केली. वाहनांची कागदपत्रेही बनावट तयार करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडेही या वाहनांची नोंदणी केली.

हे ही वाचा : शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न?

Related Stories

विषप्राशन केलेल्या प्रेमवीराचा मृत्यू

Archana Banage

अनेक हातांनी घडताहेत उंच गणेशमूर्ती

Kalyani Amanagi

कोल्हापूर हद्दवाढ:म्हटलं तर एका दिवसात नाहीतर कधीच नाही

Kalyani Amanagi

शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अजित नरदे यांचे निधन

Archana Banage

धामणी मध्यम प्रकल्पातील भुसुरुंग स्फोटामुळे घरानां तडे, ग्रामस्थांतून संताप

Archana Banage

कळंबा तलावात युवक बुडाला

Abhijeet Khandekar