ऑनलाईन टीम / तरुण भारत :
MiG 29K fighter jet crashes in Goa भारतीय हवाई दलाचे MiG 29K लढाऊ विमान आज सकाळी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर कोसळले. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानातील पायलट सुखरुप असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.
गोव्याच्या किनाऱ्यावर आज सकाळी या विमानाने नियमित उड्डाण केले होते. त्यानंतर तळावर परतत असताना इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यावेळी हे विमान समुद्र किनाऱ्यावर कोसळले. अपघातापूर्वी वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विमानातून समुद्रात उडी मारली. त्यानंतर नौदलाने शोध आणि बचावकार्य करत वैमानिकाचा जीव वाचवला.
अधिक वाचा : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजप-महायुतीचा उमेदवार ठरला