Tarun Bharat

सर्व षडयंत्र शिंदेंच नसून भाजपचं; नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

आपण स्वबळावर आमदार झालो नाही. आपल्या मागे बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. मतदारसंघातील शिवसैनिकांनी आपल्यासाठी जिवाच रान केलं आहे. ज्या मतदारांनी तुम्हाला शिवसैनिक म्हणून निवडून दिलं त्या पदाचा आदर करावा. आणि भविष्याचा विचार करून तुम्ही पुन्हा परत या असे आवाहन नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केलं. याच बरोबर हे षडयंत्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नसून भाजपचे असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला.

हेही वाचा-‘होय, संघर्ष करणार..’ संजय राउतांचे ट्विट

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमदार जातील मात्र मतदार जाणार नाहीत. पक्ष हा कार्यकर्त्यावर अवलंबून असतो. आमदारांवर अवलंबून नसतो. भविष्यातील विचार करून त्यांनी परत यावं. चुकीच्या पद्धतीने भाजपा प्रचार करत आहे. ईडीच्या कारवाईच्या दबावामुळे काही आमदार बळी पडले आहेत. ईडीचा दबाव टाकून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) धमक असेल तर निवडणूक लावून दाखवा. जनतेसमोर येऊन दाखवा. तुम्हाला जनतेची ताकद कळेल असा इशारा त्यांनी दिला. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी परत यावे असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा- उध्दव ठाकरेंच्या संबोधनाचं इम्तियाज जलील यांनी केले कौतुक


माझा घातपात झाला

माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होती. दहशतीचं वातावरण होतं. मला पोलिसांनी पकडल जबरदस्तीने लाल कारमधून नेले. जबरदस्तीने रुग्णालयात नेऊन त्यांनी मला इंजेक्शन दिलं. मात्र देवाच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने मी आज सुखरूप आहे. छत्रपतीं शिवाजी महाराज जसे आग्राहून सुटून आले तसे मी देखील युक्ती केली त्यांना शरणागती आलो आणि गुवाहटी वरुन सुखरूप आज पोहोचलो अशी माहिती त्यांनी दिली.

Advertisements

Related Stories

दिवाळीनंतर एका लसीच्या डोसनंतर मुक्त संचार

Abhijeet Shinde

राहुल गांधींचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘जुलाई आ गया, वैक्सीन नहीं आयी’

Abhijeet Shinde

संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयांचे मोदींनी केले उद्घाटन

datta jadhav

देशात ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय, जनतेनं सावध रहावं : पंतप्रधान

Abhijeet Shinde

“मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक”

Abhijeet Shinde

महाराष्ट्र केसरीचा आखाडा सातारला रंगणार!

datta jadhav
error: Content is protected !!