Tarun Bharat

गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी केली आहे. तसेच गांधी घराण्यातील कोणतीही व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

केरळमधील प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना गेहलोत म्हणाले, राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावं, यासाठी मी अनेकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. प्रदेश काँग्रेस कमिटीनेही राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत हा ठराव मंजूर केला आहे, मात्र त्यांनी याला नकार दिला असून, यावेळी गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे.

अधिक वाचा : साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, प्रियंका संकपाळ-जाधव AIBE परीक्षेत देशात प्रथम

दरम्यान, अध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांची नावं आघाडीवर आहेत. तर, दुसरीकडं राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अनेक नेते आग्रही आहेत.

Related Stories

सर्वोच्च न्यायालयातील १० न्यायाधीश, ३० टक्के कर्मचारी पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा!

tarunbharat

ऑगस्टमध्ये सरकारी तिजोरीत 1.12 लाख कोटी

datta jadhav

टुलकिट हे काँग्रेसचे षडयंत्र; मंत्री प्रकाश जावडेकर यांचे राहुल गांधीना प्रत्युत्तर

Abhijeet Shinde

मुंबई महापालिका आणि राज्य सरकारमध्ये समन्वय हवा : देवेंद्र फडणवीस

Rohan_P

मी तर बकऱयाला मारलंय!

Patil_p
error: Content is protected !!