कासेगाव/वार्ताहर
वाळवा तालुक्यातील येवलेवाडी-केदारवाडी दरम्यान देसाई फार्म हाऊस शेजारी दोन मोटारसायकलच्या समोरा समोर झालेल्या अपघातात एक मोटारसायकलस्वार ठार तर दुसरा मोटारसायकलस्वार जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, स्प्लेंडर एम एच १० बीजी ७१३६ मोटारसायकलस्वार दादासो शिवाजी यादव (वय ४२) रा. काळमवाडी व स्प्लेंडर एम एच १० २७७७ मोटारसायकलस्वार अंकुश राजाराम पाटील रा. कासेगाव हे आपापल्या मोटारसायकल वरून येवलेवाडी-केदारवाडी दरम्यान असलेल्या देसाई फार्म हाऊस शेजारी रात्री ७:३० च्या दरम्यान मोटारसायकलच्या समोरा समोर झालेल्या अपघातात दादासो शिवाजी यादव यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेने ते जागीच ठार झाले असून अंकुश राजाराम पाटील यांच्या पायांना मार लागला असून उपचारासाठी त्यांना कराड येथे हलवण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हे ही वाचा : नवजा येथे रस्त्याला भगदाड, रस्ता वाहूतुकीसाठी बंद