ऑनलाईन टीम/तरुण भारत
Muscat Airport: मस्कत विमानतळावर (Muscat Airport) एअर इंडिया (Air india) एक्सप्रेसच्या विमानातून अचानक धूर येऊ लागला. यावेळी विमानातून धूर निघत असताना विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमानात ४ नवजात मुलांसह १४५ प्रवासी होते. सर्व प्रवाशांना टर्मिनल इमारतीत हलवण्यात आले आहे. दरम्यान एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. हे विमान मस्कतहून कोचीला येत होते.
दरम्यान, मस्कत आंतरराष्ट्रीय विमानताळावर बुधवारी एयर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातून अचानक धूर निघू लागल्याने विमानतळावर धावपळ उडाली. ओमान येथील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत तब्बल १४ प्रवासी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना तेव्हा घडली जेव्हा हे विमान उड्डाणाच्या तयारीत होते. विमानातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी तातडीने विमानातील प्रवाशांना स्लाइडरच्या साह्याने प्रवाशांना बाहेर काढले. हे विमान बुधवारी मस्कत येथून कोची येथे येणार होते. मात्र, त्यापूर्वीच ही दुर्घटना घडली.
हे ही वाचा : अहमदाबादमध्ये लिफ्ट कोसळून ७ कामगारांचा मृत्यू
विमानाने उड्डाण घेण्याच्या काही क्षण आधी विमानातून धूर निघताना दिसला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याबाबत एका निवेदनात म्हटले आहे की, रिलीफ फ्लाइट्सची व्यवस्था केली जाईल. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी कालिकतहून दुबईला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान जळण्याच्या वासाने मस्कतला वळवावे लागले होते. दरम्यान १५ दिवसात अशा दोन घटना घडल्या असून ही तीसरी घटना आहे.
नागरिक उड्डयन संचलनालयाने या संदर्भात निवेदन दिले असून प्रवाशांना दुसऱ्या प्लाइटने भारतात आणले जाणार आहे. दोन महिन्यांपूर्वीही कालीकत येथून दुबईला जाणारे एयर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातून जळण्याचा वास येत असल्याने हे विमान तातडीने मस्कत येथे उतरवण्यात आले होते. मात्र, विमानातून गंभीर असा तांत्रिक बिघाड आढळला नव्हता.