ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या बंडांनंतर शिवसेना कुणाची यावरून आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दसरा मेळाव्यावरून शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गटात (shinde group) आरोप – प्रत्यारोपांचे राजकारण सुरु झाला आहे. शिवसेना शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यावर ठाम असून दुसरीकडे बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानात मेळावा घेण्यास शिंदे गटाने अर्ज केला होता. तो अर्ज एमएमआरडीने स्वीकारला आहे. त्यामुळे शिंदे गटाला बीकेसी मैदानावर मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रोखठोख मत मांडले आहे.
शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना हेच समीकरण असल्याचं सांगत शरद पवारांनी शिवसेनेची पाठराखण केली आहे. “बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यरत आहे. दसरा मेळावा घेण्याची त्यांची परंपरा आहे, ती लक्षात घेता त्यांनी केलेली मागणी गैर नाही,” असं शरद पवार म्हणाले आहे. शरद पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हे ही वाचा : राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला
तसेच एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांना बीकेसीचं मैदान देण्यात आलं आहे. मात्र शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाचं असं मत शरद पवारांनी केलं आहे.
एमएमआरडीच्या मुख्य मैदानासाठी शिंदे गटाकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या नियमानुसार एमएमआरडीएकडून शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेकडूनही बीकेसीतील दुसऱ्या मैदानासाठी परवानगी मागण्यात आली होती. पण संबंधित मैदानाआधी एका कंपनीकडून कार्यक्रमासाठी आरक्षित केल्याने ठाकरे गटाची परवानगी नाकारण्यात आली आहे