महाविकास आघाडीतून बाहेर पडणार मग ते भाजपा सोबत जाणार आहेत का? दबावाखाली शिवसेनेनं ही भूमिका घेतली आहे का हे अजून स्पष्ट झालेले नाही. काल मुख्यमंत्री यांनीही असा कोणताही निर्णय दिलेला नाही. पण मविआतून बाहेर पडून शिवसेना भाजप सोबत दुय्यम भूमिका घ्यायला तयार आहे का याचे स्पष्टीकरण द्यायला हवं अशी प्रतिक्रिया काॅंग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माध्यमांना दिली. शिवसेना मविआतून बाहेर पडेल पण २४ तासाच्या आत आमदारांनी मुंबईत यावं असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वक्तव्य करताच पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
काही आमदारांसाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी, दबावाखाली मुख्यमंत्री युर्टन घेतील असं मला वाटत नाही. पण हा शिवसेनेचा अंर्तगत प्रश्न आहे. आम्हाला टिप्पणी करायचा अधिकार नाही. मविआतील प्रत्येक घटकाला आपली भूमिका घ्यायचा अधिकार आहे. त्यांचा तो नेतृत्वाचा, वयक्तिक प्रश्न आहे.पण २४ तासाच्या आत अशा पध्दतीचा युर्टन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील याचं मला आश्चर्य वाटतंय असेही ते म्हणाले.
हेही वाचा- शिवसेना ‘मविआ’तून बाहेर पडणार पण… राऊतांनी घातली ‘ही’ अट
शिवसेनेचे अधीकृत विभाजन झाले नाही. शिंदे यांनी स्वत:ला अध्यक्ष म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेत नेमकं काय सुरु आहे हे समजत नाही. मात्र उध्दव ठाकरे यांनी फेसबूकच्या माध्यमातून आपली भूमिका मांडावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

