Tarun Bharat

महाराष्ट्रात गुरुवारपासून पाऊस वाढणार

पुणे / प्रतिनिधी :

Rain will increase in Maharashtra from Thursday महाराष्ट्रात येत्या गुरुवारपासून (ता. 8) पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. यात काही भागाला यलो तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

सात सप्टेंबरच्या आसपास पूर्वमध्य अरबी समुद्रात हवेची द्रोणीय स्थिती निर्माण होणार असून, पुढील 48 तासांत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होण्याचा अंदाज आहे. याच्या प्रभावामुळे मध्य भारत तसेच दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळेच महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. उत्तर कर्नाटक ते कॉमेरुनचपर्यंत हवेचा ट्रफ पसरला आहे. कॉमेरुन भाग तसेच लगतच्या मालदीवच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती आहे. याच्या प्रभावामुळे लक्षद्वीप, तामिळनाडू, कराईकल, केरळ, महे, दक्षिण कर्नाटक, कर्नाटक किनारपट्टी, आंध्र किनारपट्टी, तेलंगणात मुसळधार पावसाचा इशारा पुढील दोन दिवस देण्यात आला आहे. याशिवाय केरळ व महेच्या भागात मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा : मुंबईवर भाजपचेच वर्चस्व पाहिजे; अमित शाह गरजले

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तुरळक पाऊस

दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी तसेच बुधवारी तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गुरुवारनंतर पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे.

Related Stories

पुणे विभागातील 5 लाख 45 हजार 378 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

अल्पवयीन विद्यार्थीनीचा शिक्षकाकडून विनयभंग

Patil_p

“देशाचा प्रत्येक नागरिक शेतकऱ्याबरोबर”

Archana Banage

लॉकडाऊन वाढवल्यानंतर हरियाणा सरकारने केली ‘ही’ घोषणा

Tousif Mujawar

लखनऊ : भाजप नेते संजय सिंह यांना तात्काळ बंगला खाली करण्याचे आदेश

Tousif Mujawar

आजपासून टप्पाटप्प्याने ‘अनलॉक’

Archana Banage