Tarun Bharat

Ratnagiri; विद्यार्थ्यावर काळाचा घाला; ब्रेक निकामी झाल्याने अपघात

दापोली- प्रतिनिधी

सायकलचे ब्रेक निकामी होऊन झालेल्या विचित्र अपघातात काल गुरुवारी सायंकाळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला. तो आपल्या सायकलवरून घरी जात असताना ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावर पडल्याने त्यांला गंभिर दुखापत झाली होती.

अधिक वाचा- Breaking : जपान हादरलं ! माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

दापोली शहराजवळील गिम्हवणे आझादवाडी येथील आर्यन विनोद गौरत शहरातील लोकमान्य हायस्कूलमध्ये इयत्ता 10 वीत शिक्षण घेत होता. काल सायंकाळी शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे सायकल घेऊन घरी जाण्यासाठी निघाला होता. पण तीव्र उतारात सायकलचे ब्रेक निकामी झाल्याने त्याचा अपघात झाला. त्याच्या मित्रांनी त्याला शाळेत पुन्हा नेलं. शिक्षकांनी तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी साडेसात वाजता त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related Stories

कशेडीत केवळ खेडवासीयांचेच स्वॅब

Patil_p

रत्नागिरी : ‘प्लाझा थेरपी केंद्रा’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Archana Banage

रत्नागिरीत रेल्वे पोलिसांच्या ताब्यातून अट्टल चोरटा पसार

Archana Banage

रत्नागिरी : दापोलीत ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ६ रूग्ण

Archana Banage

पहिल्या दिवशी सर्व व्यापाऱयांची चाचणी निगेटिव्ह

Patil_p

बसणीतील श्री महालक्ष्मीला सोनेरी किरणांचा अभिषेक

Patil_p