ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील तीन वर्षात 38 हजार 800 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती सरकार करणार आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी ही नियुक्ती असणार आहे. या शाळांच्या माध्यमातून साडे तीन लाख आदिवासी मुलांसाठी शिक्षण उपलब्ध होणार आहे.
शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. लहान मुलं आणि शाळकरी मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. त्यांना वयानुसार विविध विषयांची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
अधिक वाचा : 81 लाख महिला बचतगटांचे होणार सबलीकरण