चार चोरीच्या दुचाकी हस्तगत
प्रतिनिधी/सातारा
सातारा शहरात दुचाकी चोरुन त्या शहरात फिरवून सोडून देवून पुन्हा दुसरी दुचाकी चोरी केली जात होती. अशा अटल दुचाकी चोरटयास सातारा शहर पोलिसांनी जेरबंद केले असून अभिजित भरत पवार (वय 28, रा. शेरेवाडी, ता. माण) असे त्या चोरटय़ाचे नाव आहे. त्याच्याकडून चार चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 28 जुन 2022 रोजी वनवासवाडी येथून दुचाकी चोरी झाली होती. त्याचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऑचल दलाल यांच्या सुचनेप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भगवान निंबाळकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सुचना दिल्या. त्याअनुषंगाने डीबी पथकाने दुचाकी चोरीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेवून शोध घेतला असता माण तालुक्यातील शेरेवाडी येथील युवक हा सातारा शहरात दुचाकी चोरायचा आणि वापरुन तेथेच सोडून द्यायचा. त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने चार दुचाकी चोरल्याचे पोलिसांकडे कबुली दिली असून त्या चारही दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, दादा दगडे, महिला पोलीस नाईक वर्षा शिंदे यांनी केली आहे.
हे ही वाचा : पंजाब पोलीस आणि मुसेवाला प्रकरणातील हल्लेखोरांमध्ये चकमक, सिद्धू मुसेवालाचा हल्लेखोर ठार