Tarun Bharat

कोल्हापुरचा शाही दसरा स्टेट फेस्टिव्हल करणार

पालकमंत्री दीपक केसरकर : शासनाच्या सहाभागासाठी श्रीमंत शाहू छत्रपतींची आज घेणार भेट : म्हैसुरच्या धर्तीवर भव्य प्रमाणात सोहळा करण्याचा प्रयत्न

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

दसरा चौकात होणाऱया शाही दसरा सोहळय़ाला ऐतिहासिक परंपरा आहे. अशा पद्धतीचा सोहळा देशातील ठराविक राज्यातच होतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरु केलेली ही वैभवशाली परंपरा राज्यभरातील जनतेसमोर नेण्यासाठी कोल्हापुरचा शाही दसरा स्टेट फेस्टीवल करणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच या शाही दसऱयातील सोहळय़ात शासनाच्या सहभागास परवानगी देण्यासाठी आज श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेणार आहे. म्हैसुरच्या धर्तीवर कोल्हापुरचा दसरा सोहळाही भव्य स्वरुपात करण्याच प्रयत्न असणार आहे, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थित होते.

हे ही वाचा : हिंदुत्वाच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी लोक बीकेसीवर येतील- मंत्री दीपक केसरकर

पालकमंत्री केसरकर म्हणाले, म्हैसुरमध्ये होणारा दसरा सोहळा राज्यस्तरावर भव्य दिव्य स्वरुपात केला जातो. येथील दसरा सोहळय़ाचे नियोजन शासनाकडून केले जाते. कोल्हापुरात होणाऱया दसरा सोहळय़ाचे नियोजन छत्रपती परिवाराकडून केले जाते. या सोहळय़ात शासनास सहभागी होण्यासाठी छत्रपती घराण्याच्या परवानगीची आवश्यकता आहे. यासाठी रविवार 2 रोजी सकाळी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेणार आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर कोल्हापुरचा दसरा सोहळाही भव्य दिव्य करुन नागरिकांचा सहभाग वाढविण्याच दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

कॅबिनेटमध्ये चांगला निर्णय घेवू
मंगळवारी होणाऱया कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शाही दसरा स्टेट फेस्टीव्हल करण्यासाठी चर्चा करणार आहे. बैठकीमध्ये कोल्हापुरच्या दसरा सोहळा संदर्भात चांगला निर्णय घेवू, असा विश्वासही मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.

पुढील वर्षी संस्थान काळानुसार सोहळा
संस्थान काळात हत्ती महाराजांचा वाहन ओढत होता. त्यानुसार पुढील वर्षीही हत्ती वाहन ओढत आणेल अशा पद्धतीचे नियोजन आहे. यंदाच्या दसरा सोहळय़ासाठी फार कमी वेळ आहे. त्यामुळे पुढील वर्षी संस्थान काळानुसार दसरा सोहळा साजरा करण्याचे नियोजन करणार असल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

प्रमुख व्यक्ती, संघटनांशी चर्चा करणार
कोल्हापुरच्या शाही दसरा सोहळय़ासह पर्यटन विकास संदर्भात लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. जिल्हय़ाच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच कोल्हापुरातील प्रमुख व्यक्ती, संघटना यांच्याशीही चर्चा करुन यासंदर्भात त्यांचेही म्हणणे ऐकून घेणार असल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

साताऱ्यात शिवसृष्टी साकारणार

साताऱयात शिवसृष्टी व्हावी, अशी इच्छा राजमाता यांनी व्यक्त केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचाही यामध्ये मोठा सहभाग असणार आहे. शिवसृष्टी साकारल्यास कोल्हापूर, सातारा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या साम्राज्याचा केंद्रबिंदू ठरतील, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगतिले.

Related Stories

कोल्हापूर : उत्तर कार्याचा खर्च टाळून केला कोरोना योध्दांचा सत्कार

Abhijeet Shinde

वंचित विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती मिळावी

Abhijeet Shinde

केएसए लीगवर प्रॅक्टीस (अ) चा सलग दुसऱयांदा कब्जा 

Abhijeet Shinde

कोल्हापूर : रासायनिक खतांच्या किंमती कमी करा : खासदार धैर्यशील माने

Abhijeet Shinde

गडहिंग्लज कारखाना भाड्य़ाने देणार

Abhijeet Shinde

‘भूविकास’चे कर्जदार शेतकरी, कर्मचाऱ्यांना दिलासा द्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!