ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर लढ्याबाबत चर्चा होऊ शकते.
शिंदे आणि फडणवीस काल दिल्लीत दाखल झाले आहेत. रात्री 9 वाजता या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री नऊच्या सुमारास सुरु झालेली बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती. या बैठकीत सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर तसेच तसेच कायदेशीर लढय़ाबाबत चर्चा झाली. आज हे दोन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. मोदींसोबतच्या बैठकीतही याच मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा : पुढचे चार दिवसही पावसाचे, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी
दरम्यान, शाहंसोबतच्या बैठकीत शिंदे गटातील अपक्ष आमदारांना आणि ठाकरे सरकारमधील सर्व मंत्र्यांना मंत्रिपदे देण्याचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीत मंत्रिमंडळातील एकूण 43 मंत्र्यांपैकी शिंदे गटाने 10 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याची केली आहे. तर भाजपला 28 मंत्रिपदे देण्याचं या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाला कोणती खाती द्यायची यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. गृहखातं फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची चर्चा आहे.