Tarun Bharat

मुलाखतींच्या भूलथापांना बळी पडू नका

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे आवाहन : अधिकृत मुलाखती नसल्याचे केले स्पष्ट

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवसेना पदाधिकारी निवडीसाठी शहरात मुलाखती घेण्यात येत आहेत. मुलाखती घेणारे हे शिवसेनेचे नाहीत. सत्तेसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र आलेल्यांकडुन मुलाखती घेतल्या जात आहेत. या मुलाखती अधिकृत नाहीत, त्यामुळे मुलाखतींच्या भुलथापांना कोणीही बळी पडू नये असे आवहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले आहे.

हे ही वाचा : काँग्रेसतर्फे जीएसटी रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार

पवार म्हणाले, शिवसेनेचे पदाधिकारी निवडण्यासाठी शहरात मुलाखती होत असल्याचे ऐकायल मिळाले. पण शिवसेनेकडून अधिकृतरित्या कोणत्याही मुलाखती कोल्हापुरात घेतल्या जात नाही आहेत. शिवसेना हि उद्धव ठाकरेंचीच आहे. धनुष्यबाण हा शिवसेनेचाच राहणार आहे. ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना धक्का दिला. पक्षप्रमुखांना फसवून त्यांच्या पाठीत वार केला. सत्तेसाठी आणि वैयक्तिक लाभासाठी एकत्र आलेली ही लोक शिवसेनेची होवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून घेण्यात येणाऱया मुलाखतींच्या भुलथापांना शिवसेनेचे पदाधाकरी, शिवसैनिक अथवा अन्य कोणीही सामाजिक कार्यकर्ते यांनी बळी पडू नये. या मुलाखती शिवसेनेकडून घेण्यात येत नसल्याचे जिल्हाप्रमुख पवार यांनी स्पष्ट केले.

Related Stories

विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक कामे तातडीने करा; आ. सतेज पाटील यांच्या सुचना

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक; दोघे जखमी

Archana Banage

कोडोली नळपाणी पुरवठा योजना ताब्यात घेण्यासाठी दबावतंत्र

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृत्यू, सक्रीय रूग्णांमध्ये घट

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगावात ५ कोरोना रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या १६६ वर

Archana Banage

कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबातील ५ जणांची चाचणी निगेटिव्ह

Archana Banage