ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 14.2 किलोच्या 12 सिलिंडरवर ही सबसिडी देण्यात येणार आहे. नवीन आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे. 14.2 किलोच्या घरगुती वापराच्या 12 सिलिंडरवर ही सबसिडी असेल. 1.6 कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार असून, सर्वसामान्यांना महागाईच्या झळीतून काहीसा दिलासा मिळेल.
मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ही सबसिडी मंजूर करण्यात आली आहे. या सबसिडीसाठी 2023-24 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या तिजोरीवर 7,680 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
अधिक वाचा : बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार?