ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज पुन्हा इतिहास रचला. इस्रोच्या LVM-3 रॉकेटने ब्रिटनच्या नेटवर्क ऍक्सेस असोसिएटेड लिमिटेडच्या (वनवेब) 36 उपग्रहांना घेऊन यशस्वी प्रक्षेपण केले. सकाळी 9 वाजता श्री हरिकोटावरुन हे रॉकेट अवकाशात झेपावले. उपग्रहांना घेऊन LVM-3 ने झेप घेतल्यानंतर त्याचं एकूण वजन 5805 टन आहे. या मिशनला LVM3-M3/वनवेब इंडिया-2 असं नाव देण्यात आलं आहे.
LVM-3 इस्रोचे सर्वात मोठे रॉकेट आहे. ब्रिटनच्या वनवेब ग्रुप कंपनीने इस्रोच्या वाणिज्यिक शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेडसोबत 72 उपग्रह लाँच करण्याचा करार केला आहे. चांद्रयान-2 मोहिमेसह सलग पाच यशस्वी मोहिमा LVM-3 मधून प्रक्षेपित करण्यात आल्या आहेत. त्याचे हे सहावे उड्डाण आहे. जर हे प्रक्षेपण यशस्वी झाले तर वनवेब इंडिया-2 स्पेसमध्ये 600 पेक्षा जास्त लोअर अर्थ ऑर्बिट सेटेलाइट्सच्या कान्स्टलेशन पूर्ण करेल.
अधिक वाचा : ‘शिवसृष्टी’साठी राज्य सरकारकडून 50 कोटींचा निधी प्राप्त