Tarun Bharat

सुरज वशिष्ठची ऐतिहासिक कामगिरी; 32 वर्षानंतर ग्रीको रोमन कुस्तीत भारताला सुवर्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

ग्रीको-रोमन अंडर-17 वर्ल्ड चॅम्पयिनशिपमध्ये भारताचा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने सुवर्णपदकाला गवसणी घालत 32 वर्षांचा दुष्काळ संपवला. या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने 55 किलो वजनी गटात हे यश मिळवले आहे.

16 वर्षीय सुरजने सुवर्णपदकाच्या लढतीत अझरबैजानच्या फरीम मुस्तफेववर 11-0 अशी मात दिली. फरीम हा युरोपिजन विजेता आहे, पण त्याला सुरजने संधीच दिली नाही. दुसऱ्या हाफमध्ये सुरजने टेकडाऊन घेत 3-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्याने दोनवेळा प्रत्येकी चार गुण घेतले. त्यामुळे अझरबैजानी मल्लाला संधीच उरली नाही.

17 वर्षाखालील ग्रीको-रोमन स्पर्धेत भारताचे हे केवळ तिसरेच सुवर्णपदक आहे सिनियर गटात भारताला ग्रीको रोमनचे एकही सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. पप्पू यादव याने 1990 मध्ये 17 वर्षाखालील गटात ग्रीको रोमन प्रकारात विश्व विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर पाच भारतीय कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचले, परंतु कोणालाही सुवर्णपदक मिळू शकले नाही. त्यानंतर तब्बल 32 वर्षांनी आता सुरज वशिष्ठने सुवर्णपदकाची कमाई करून हा दुष्काळ संपवला.

हेही वाचा : अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातही कोट्यवधींचं घबाड; 29 कोटींची रोकड, 5 किलो सोने जप्त

Related Stories

विराट कोहलीची घसरण, जो रुटची झेप

Patil_p

Breaking : शिवसेनेची मशाल कर्नाटक सरकारने रोखली

Kalyani Amanagi

धनुष, प्रियेशा यांना नेमबाजीत सुवर्णपदक

Patil_p

यू-23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये साजनला कांस्य

Amit Kulkarni

कसोटी मालिका विजयासाठी सर्वोत्तम कामगिरीची गरज

Omkar B

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

datta jadhav
error: Content is protected !!