ऑनलाईन टीम / तरुण भारत
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना सध्या पहायला मिळत आहे. आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफड केली. या घटनेनंतर तानाजी सावंत (Tanaji savant) यांनी फेसबुक पोस्ट करत याला प्रत्यूत्तर दिले आहे. येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल आपल्या औकातीत राहावं.. असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
तानाजी सावंत आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, आमचे गटनेते मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत.एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल.माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं…असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा- दादागिरी खपवून घेणार नाही; माझ्या पक्षाचे कार्यकर्ते शिंदेंच्या पाठीशी
शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा सावंतांना इशारा
ज्या आमदारांनी बंड केले आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहे. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या ऑफिसची अवस्था झाली आहे. तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला होता.