Tarun Bharat

दसरा महोत्सवातून समतेचा संदेश पोहोचावा – श्रीमंत शाहू छत्रपती

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

यंदा भव्यतेने साजऱया होणाऱ्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातून राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या सामाजिक समतेच्या संदेशाचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केली.
शाही दसरा महोत्सवाच्या आयोजनाबाबत न्यू पॅलेस येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी शाहू महाराज म्हणाले, प्रशासनाच्या सहयोगाने यंदाच्या शाही दसरा महोत्सवात अधिकाधिक नागरिक सहभागी होतील, यादृष्टीने नियोजन करावे. महोत्सवात विविध घटकांना सामावून शाहूकालीन महोत्सवाचे स्वरुप प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत.

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा, राजघराण्याचा, विविध पारंपरिक लोककलांचा वारसा आहे. कोल्हापूरचा दसरा महोत्सव घोडे, उंट, मर्दानी खेळ, पोवाडा, कुस्ती प्रात्यक्षिके, पारंपंरिक वेषभूषा अशा शाही लवाजम्यासह राजेशाही थाटात साजरा करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. राजेशाही दसरा महोत्सव लोकसहभागातून अधिक व्यापक, भव्य स्वरुपात साजरा करण्यावर राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. यंदाचा दसरा महोत्सव थेट प्रक्षेपणातून सर्वसामान्यांपर्यत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यटकांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

हे ही वाचा : कोल्हापुरात यंदा दोन दिवसांचा दसरा महोत्सव

महोत्सवात शाहूकालीन विविध मर्दानी खेळ, कलांचे सादरीकरण व्हावे, अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली. कोल्हापूरचा दसरा महोत्सव भविष्यात देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याबाबत मालोजीराजे छत्रपतींनी प्रशासनाचे कौतुक केले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दसरा महोत्सवासाठी प्रशासनाच्या तयारीबाबत माहिती दिली.

महोत्सवात महिला बचत गटांचा, विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले. महोत्सवासाठी नागरिकांचा प्रतिसाद पाहता वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

Related Stories

कोल्हापूर : सराईत चोरट्यांना कागल पोलिसांनी केले जेरबंद

Archana Banage

…अखेर मालाई धनगरवाड्याच्या निराधार आजीने घेतला अखेरचा श्वास

Archana Banage

Kolhapur; ढोलगरवाडी येथील नागपंचमी कार्यक्रम रद्द..

Abhijeet Khandekar

कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्यांचे शिक्षण सरकार पूर्ण करणार; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

Abhijeet Khandekar

आर. के. नगर मधील ‘त्या’ रुग्णाच्या कुटुंबियांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage

सांगलीतील तरूणाचा कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!