ऑनलाईन टीम / तरुण भारत :
निवडणूक आयोगाने पर्याय दिल्यानंतर ठाकरे गटाकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहेत. मात्र, ही चिन्हे निवडणूक आयोगाकडे शिल्लक असलेल्या यादीत नाहीत. त्यामुळे ठाकरेंपुढे पुन्हा पेच निर्माण झाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्या 197 फ्री निवडणूक चिन्ह आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही गट त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. दरम्यान, ठाकरेंना यादीत नसलेली चिन्हे कशी मिळणार? जर यादीतील चिन्ह घ्यायचं ठरलं तर कोणतं चिन्ह ठाकरेंना मिळणार असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अधिक वाचा : निवडणूक आयोगाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात?
शिवसेनेने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांबरोबर ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या तीन नावांची यादीही आयोगाला पाठवली आहे.