ऑनलाईन टीम / तरुण भारत :
निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, ठाकरे गट याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. दरम्यान, पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाने पहिल्यांदाच एक पाऊल मागे घेतले आहे. शिवसेनेच्या नावावर सुरू असलेल्या ट्विटर हँडल आणि वेबसाईटवरून पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हटवले आहे.
रविवारी शिवसेनेच्या अधिकृत (@ShivSena) ट्विटर हँडलवरुन ब्लू टिक गायब झाली. तसेच शिवसेनेची अधिकृत वेबसाईटही (ShivSena.in) बंद असल्याचे लक्षात आले. ही दोन्ही अकाऊंट ठाकरे गट हाताळत होता. सुरूवातीला ही अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर ठाकरे गटानेच यासंदर्भातील निर्णय घेतल्याचे समोर आले. ठाकरे गटाने शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही हटवले आहे.
अधिक वाचा : बाप-लेकानेही आता आमच्या पक्षात यावे; मंत्री भुमरेंनी ठाकरेंच्या जखमेवर चोळलं मीठ