Tarun Bharat

…तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं : शरद पवार

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)आणि सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. त्यामधील एक किस्सा आज पुण्यातील कार्यक्रमात शरद पवार यांनी सांगितला. सुशीलकुमार शिंदे यांनी माझ्या सांगण्यावरुन पोलीस खात्यातील नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देतो, असे आश्वासन दिलं होतं. पण, मी त्यांना तिकीट मिळवून देऊ शकलो नाही, तेव्हा माझ्या डोळय़ात पाणी आलं, असं पवार यांनी सांगितलं.

पुणे नवरात्र महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा ‘महर्षी पुरस्कार’ यंदा सुशीलकुमार शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले, शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील बनवले. आपल्या ज्या काही केसेस असतील तर त्या शिंदेंना द्यायचे ठरले. पुढे त्यापुढील निवडणुकीत शिंदेंना तिकीट मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर त्यांनी मागे बघून पाहिल नाही.

अधिक वाचा : MCA च्या अध्यक्षपदासाठी आशिष शेलार विरूद्ध संदीप पाटील सामना

दसरा मेळाव्यावर बोलताना ते म्हणाले, संघर्ष होतो. पण त्यावर मर्यादा ठेवली गेली पाहिजे. दसरा मेळाव्यावरुन जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झालेत पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही, याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी.

Related Stories

५ हजाराची लाच स्विकारताना मुख्याध्यापकास अटक

Archana Banage

वर्षभरात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील

datta jadhav

कोल्हापूर : महात्मा फुले जीवनदायी योजनेला मुदतवाढ

Archana Banage

15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचे पहिल्याच दिवशी रेकॉर्ड

Patil_p

नितीन गडकरींच्या पत्राला मुख्यमंत्र्यांच उत्तर म्हणाले, तुम्ही बोलता फार प्रेमळ पण लिहिता कठोर

Archana Banage

आमदार संतोष बांगरांचा पीकविमा कार्यालयात राडा; अधिकाऱ्यांनाही केली शिवीगाळ

Archana Banage
error: Content is protected !!