पुणे / प्रतिनिधी :
This year, Northeast Monsoon is also more in the country; while in the south on average ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान भारतात कोसळणारा ईशान्य मोसमी पाऊस यंदा दक्षिणेत सरासरीइतका, देशभरात सरासरीपेक्षा अधिक, तर वायव्य व ईशान्य भारताच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास अधिकृतरित्या 30 सप्टेंबर रोजी संपला आहे, तर परतीच्या मान्सूनला सुरुवात झाली असून, दिल्ली, ते उत्तर प्रदेशपर्यंत तो माघारी परतला आहे. दरम्यान, ऑक्टोबर व डिसेंबरच्या दरम्यान ईशान्य मोसमी पाऊस होत असतो. याबाबतचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. यात दक्षिणेतील तामिळनाडू, पाँडेचरी, कराईकल, आंध्र किनारपट्टी, येनम, रायलसीमा, केरळ, महे, कर्नाटकचा अंतर्गत भागात सरासरीइतका 88 ते 112 टक्क्यांदरम्यान पावसाची शक्यता आहे. वायव्य तसेच ईशान्यकडच्या भागात सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
अधिक वाचा : देशात आजपासून 5G सेवेला सुरूवात, 4G च्या तुलनेत 10 पट वेगवान
ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस
ऑक्टोबर महिन्यात ईशान्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. या महिन्यात पर्जन्यमान सरासरीच्या 115 टक्के राहील. मात्र, दक्षिण तसेच उत्तरेकडील काही भागांत पाऊस कमी राहणार आहे. दुसरीकडे ऑक्टोबर महिन्यात देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरी वा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे, तर किमान तापमान बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक राहण्याची चिन्हे आहेत. दक्षिण भारत तसेच वायव्य भारताच्या काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
परतीचा मान्सून पुढे सरकला
परतीचा मान्सून पुढे सरकला असून, तो जम्मू, हिमाचल प्रदेश, दिल्ली, चंदीगड, गुजरात, उत्तरप्रदेशच्या काही भागातून माघारी फिरला आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सून महाराष्ट्रातून माघारी फिरेल.