ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अमेरिकन लष्कराच्या विंटेज बोईंग बी-17 आणि बेल पी-63 या दोन विमानांची आकाशात समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला. टेक्सासमध्ये आयोजित एका एअर शो दरम्यान शनिवारी दुपारी ही घटना घडली. या दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
टेक्सासमधील दुसऱ्या महायुद्धाच्या स्मरणार्थ डॅलसमध्ये एअर शो आयोजित केला होता. यात अमेरिकन लष्कराची विंटेज विमानं सहभागी झाली होती. बोईंग बी-17 विमान हवेत एअर शो करत असताना अचानक बेल पी-63 नावाचं दुसरं विमान या विमानावर येऊन आदळलं. त्यानंतर या विमानांचे तुकडे होऊन विमानं खाली कोसळली अन् स्फोट झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 40 हून अधिक गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या. घटनास्थळी तात्काळ बचावकार्य राबविण्यात आले. या दुर्घटनेत पायलटसह एकूण 6 जणांना मृत्यू झाला आहे. दोन विमानांची आकाशात धडक होतानाची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
अधिक वाचा : पुढील काही दिवस थंडी ‘जैसे थे’च
अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन मंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार FAA आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.