कोल्हापूर / प्रतिनिधी :
21 lakh two-wheeler burnt in Kolhapur कळंबा रोडवरील जनाई दत्तनगरमधील राजेश चौगुले या युवकाने काही दिवसांपूर्वी घेतलेली 21 लाख रुपये किमतीची स्पोर्ट्स बाईक शुक्रवारी पहाटे जळून खाक झाली. या दुचाकी बरोबरच येथील चार चाकी ही जळून खाक झाली. या आगीचे कारण समजू शकले नाही. आगीमध्ये दोन्ही वाहने पूर्णतः जळून खाक झाल्याने चौगुले यांचे जवळपास 40 लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी करवीर पोलिसांकडून तपास सुरू आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
महिनाभरापूर्वी नवीन दुचाकी घेतल्यावर वाजत गाजत मिरवणूक
राजेश चौगुले यांनी हाऊसेने 21 लाखाची दुचाकी घेतली. नंतर परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढत आपल्या दुचाकीच स्वागत केलं. मात्र, महिनाभरातच या गाडीने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. ही आग कशामुळे लागली? किंवा कोणी लावली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अधिक वाचा : साखर कारखान्यांनी खासगी काट्यावर वजन केलेला ऊस नाकारल्यास कारवाई