Tarun Bharat

ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शरदिनी गोळे यांचे निधन

Advertisements

पुणे : ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शरदिनी दामोदर गोळे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या. मागील सहा दशकं त्यांनी नृत्यक्षेत्रात योगदान दिले. दिवंगत कथक नृत्यगुरू रोहिणी भाटे यांच्या त्या शिष्या होत्या. Kathak dance teacher Sharadini Gole passed away

शरदिनी गोळे यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. वयाच्या चौदाव्या वषी त्यांनी रोहिणी भाटे यांच्याकडे कथक नृत्य शिकायला सुरुवात केली. हाच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. नृत्यलंकार पदवी संपादन केल्यानंतर त्यांचा नृत्य क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. लालित्य आणि सहजसुंदर अभिनय हे त्यांच्या नृत्याचे वैशिष्टय़ होते. नृत्यभारती संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमांत रोहिणी भाटे यांच्यासह त्यांनी सादर केलेले अनेक कार्यक्रम गाजले. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात त्यांच्या कथक नृत्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली होती. दिल्ली येथील शरदचंद्रिका महोत्सव, संगीत नाटक अकादमी, कथक कला केंद्रातर्फे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता.

अधिक वाचा, Pune : चांदणी चौकातील वाहतूक पूर्ववत

नृत्यभारती संस्थेद्वारे त्यांनी अनेक वर्षे विद्यादान करून अनेक शिष्य घडविले. पुणे महापालिकेतर्फे पंडिता रोहिणी भाटे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

Related Stories

राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळतंय

datta jadhav

भाजपचा नवा राजकीय धक्का; देवेंद्र फडणवीस होणार आता उपमुख्यमंत्री

Abhijeet Khandekar

संमेलनाध्यक्षपदासाठी मसापकडून द्वादशीवार, दवणे, गोडबोले यांची नावे

datta jadhav

हिंमत असेल तर मैदानात या, भाजप आणि शिंदे गटाला उध्दव ठाकरेंचा इशारा

Archana Banage

स्थलांतरीत कामगारांची वैद्यकीय तपासणी मोफत करा

Archana Banage

”बाहेरून येणाऱ्यांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय”

Archana Banage
error: Content is protected !!