Tarun Bharat

राज्यात तुरळक पावसाचा इशारा

पुणे / प्रतिनिधी :

महाराष्ट्र तसेच गोव्यात पुढील दोन दिवस तुरळक पावसाचा अंदाज असून, चार ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचे पुणे वेधशाळेने मंगळवारी सांगितले. दरम्यान, राज्यात दक्षिण भागात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा असून, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूला सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सध्या तुरळक पाऊस होत आहे. दक्षिण छत्तीसगड ते कॉमेरुन क्षेत्राच्या दरम्यान मान्सून ट्रफ आहे. हा ट्रफ 5 ऑगस्टनंतर दक्षिणेकडे सरकरण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील भागात हवेचा दाब असल्याने या भागात गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली.कर्नाटक किनारपट्टी, कर्नाटक राज्य, केरळ, तामिळनाडूच्या अनेक भागात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. पुढील दोन दिवस या सर्व भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्र पाऊस वाढणार

महाराष्ट्रात अनेक भागात सध्या तुरळक पाऊस होत आहे. 5 ऑगस्टनंतर मान्सून ट्रफ दक्षिणेकडे सरकणार असल्याने याच्या प्रभावामुळे मध्य भारत, तसेच दक्षिणेच्या भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

हेही वाचा : पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

Related Stories

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 85 हजारांवर

datta jadhav

ईडी कारवाई होताच मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हिंट मिळाली होती…

Archana Banage

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील, नागरिकांना जाता येणार – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Archana Banage

चाकूने भोसकलेल्या युवकाचा मृत्यू

Patil_p

वीज दरामध्ये मोठी वाढ; आता युनिटनुसार कसे असणार दर, जाणून घ्या

Abhijeet Khandekar

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम-साखर आयुक्त शेखर गायकवाड

Abhijeet Khandekar