ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर केला असून, रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते. 2019 मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल पदही भूषवलं होतं.
बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये रायपूरमध्ये झाला. 1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते. 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशचे विभाजन झाल्यावर ते रायपूर मतदारसंघातून खासदार झाले. त्यानंतर रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते. केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मध्यप्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.
अधिक वाचा : कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल